नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'मध्ये सुविधांचा बोजवारा

Mumbai
नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'मध्ये सुविधांचा बोजवारा
नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'मध्ये सुविधांचा बोजवारा
See all
मुंबई  -  

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली 'तेजस एक्स्प्रेस' प्रवाशांच्या पसंतीस उतरली आणि येत्या काही दिवसांची तिकिटेही भराभर बुक होत आहेत. वेटिंग लिस्टची यादी वाढत असतानाच पहिल्या दिवशी 'तेजस एक्स्प्रेस'ने प्रवास करणाऱ्यांकडून या गाडीतील अस्वच्छतेबाबत आणि काही सुविधांचा बोजवारा उडाल्याची तक्रार सोशल मीडियावर आल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवत असताना रेल्वे प्रशासन मात्र नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'ची स्वच्छता राखण्यात कानाडोळा करत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. तेजसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रवाशांना आवाहन केले जात असले तरी अनेक बेजबाबदार प्रवाशांनी सवयीप्रमाणे कचरा केला. मात्र, त्यानंतरही गाडी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या रेल्वे प्रशासनानेही स्वच्छतेबाबत बेजबाबदारपणा दाखवला. अनेक आसनांखाली उष्टे अन्नपदार्थ आणि तत्सम फेकलेल्या वस्तू तशाच होत्या. उलट, मुंबईहून निघालेली 'तेजस एक्स्प्रेस' करमाळीला दाखल झाल्यानंतरही साफसफाई झाली नाही. परतीच्या प्रवासासाठी प्रवासी गाडीत आसनस्थ झाल्यानंतर प्रसाधनगृह स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले, असे प्रवाशांनी सांगितले. 


@IRCTC_Ltd @drmmumbaicr @RailMinIndia Respected Sir, Menu for 22119/20 released bfr inaugural, the same is not provided in Tejas,any reason? pic.twitter.com/i5SvJc51w7

— Himanshu Siloiya (@himanshusiloiya) May 24, 2017


ट्विटरवर तर एका प्रवाशाने तेजसच्या डब्यात धुरकट वातावरण अनुभवयाला मिळाले, अशा टिप्पणीचे ट्विट केले आहे. अस्वच्छ डब्यांसह प्रसाधनगृहांची अवस्था अतिशय खराब आढळून आली. रत्नागिरी रेल्वे स्थानकात बहिणीला भेटण्यासाठी खाली उतरलेला एक प्रवासी स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने बाहेरच राहिला. यावेळी दरवाजे बंद होण्याची उद्घोषणा प्रणालीची उणीव प्रकर्षाने जाणवली. तसेच, पुढील स्थानकाची पूर्वसूचना देणारी उद्घोषणा प्रणालीसुद्धा नसल्याने प्रवाशांत गोंधळ उडण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, दरवाजे एकदा बंद झाले की इमर्जन्सीच्या काळात ते पुन्हा उघडण्याची सुविधा असली पाहिजे, अशीही मागणी पुढे येत आहे. आता तर मुंबई-अहमदाबाद दरम्यान तेजस एक्सप्रेस चालणार आहे. त्यामुळे, ट्विटवरवर सातत्याने अॅक्टिव्ह असणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तेजसच्या या तेजोभंगाची दखल घेतील का?

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.