Advertisement

आता शताब्दीलाही 'अनुभूती' कोचची साथ!

पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच शताब्दी एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडला जाणार आहे. या डब्याची किंमत सुमारे २.८४ कोटी रुपये असून पुढील कालावधीत अन्य गाड्यांमध्येही त्याचा समावेश केला जाणार आहे.

आता शताब्दीलाही 'अनुभूती' कोचची साथ!
SHARES

मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेला अनुभूती डबा ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सेवेत येणार आहे. मुंबई ते अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये हा नवीन डबा जोडला जाणार आहे.


चेअरकारला जोडणार 'अनुभूती'!

चेन्नईतील इंटिग्रल कोच (आयसीएफ) कारखान्यात या अनुभूती डब्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा डबा शताब्दीतील एसी फर्स्ट क्लास एक्झिक्युटिव्ह चेअरकारला जोडला जाणार आहे. मात्र, ५६ आसनी डब्यांसाठी याचे तिकीट दर तुलनेने जास्त आहेत.


शताब्दीला पहिल्यांदाच 'अनुभूती'ची साथ

पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच शताब्दी एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडला जाणार आहे. या डब्याची किंमत सुमारे २.८४ कोटी रुपये असून पुढील कालावधीत अन्य गाड्यांमध्येही त्याचा समावेश केला जाणार आहे.


अनुभूतीसाठी स्वतंत्र आरक्षण

३ जानेवारी रोजी मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये १८ डबे असून त्यात अनुभूतीचा १९ वा डबा जोडला जाणार आहे. ३ ते ६ जानेवारीपर्यंत या डब्यासाठी गाडी क्रमांक २२००९/२००१० नुसार उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रवाशांना अनुभूती डब्यासाठी स्वतंत्रपणे आरक्षण करता येईल.

देशभरात विविध मार्गांवर अनुभूती डब्याची सुविधा पुरवण्यात आली असून त्यात मध्य रेल्वेवरील पुणे ते सिकंदराबाद एक्स्प्रेसचाही समावेश आहे.



हेही वाचा

लेडिज डब्यात आता 'एमएससी'चे जवान, पश्चिम रेल्वेवर राहणार तैनात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा