पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका, ७ कोटी ५९ लाखांचा दंड वसूल


पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका, ७ कोटी ५९ लाखांचा दंड वसूल
SHARES

प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येतं. तरीही विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. अशाच फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. 


यांच्यावर कारवाई

नोव्हेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करत ७ कोटी ५९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. १ लाख ८२ हजार गुन्ह्यांची नोंद करत पश्चिम रेल्वेने हा दंड वसूल केला आहे. या कारवाईत ८७६ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्यात आलं आहे. तर, ४६ जणांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.


कारवाई मोहीम सुरूच राहणार

पश्चिम रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध देखील कारवाई केली. त्यामध्ये १२८ जणांना पकडण्यात आले असून रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. तर १२ वर्षांवरील ६६ विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा