Advertisement

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार

महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार
SHARES

महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार असून आता बेलापूर ते गेट वे आॅफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

सागरी मंडळाने या सेवेला परवानगी दिली असून आता केवळ बंदर प्राधिकरणाकडून परवानगी मिळणे बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील पंधरा दिवसांत बेलापूर ते गेट वे आॅफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

बेलापूर-गेट वे आॅफ इंडिया, मुंबई क्रुझ टर्मिनल ते मांडवा, मांडवा ते मुंबई क्रुझ टर्मिनल आणि गेट वे आॅ फ इंडिया ते बेलापूर अशा दिवसभर या बोटीच्या फेऱ्या होतील. बेलापूर ते गेट वे अशी सकाळी साडे आठला आणि गेट वे ते बेलापूर अशी सायंकाळी साडे सहाला दोन फेऱ्या होणार आहेत. या सेवेमुळे ऐन गर्दीच्या वेळेस बेलापूर ते गेट वे अंतर ६० मिनिटांत पार करता येणार असून त्यासाठी ४००-४५० रुपये मोजावे लागतील.



हेही वाचा

मुंबईकरांना न्यू ईयर गिफ्ट! मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा