Advertisement

मुंबईकरांना न्यू ईयर गिफ्ट! मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत

मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि ७ (दहिसर ते अंधेरी) या दोन मेट्रो लाईन सेवेत दाखल होणार.

मुंबईकरांना न्यू ईयर गिफ्ट! मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा जानेवारीमध्ये सेवेत
SHARES

मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होणार असून हा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. 

मेट्रो  २ अ आणि ७ चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे. हा टप्पा सुरू करतानाच मेट्रो २ अ मधील डहाणूकरवाडी ते डी एन नगर आणि मेट्रो ७ मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येईल असे एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले होते. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने हा मुहूर्त चुकला. आता नवा मुहूर्त यासाठी देण्यात आला आहे.

मेट्रो लाईन 2A आणि 7 ला देखील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्याने दरमहा सरासरी आठ लाख प्रवासी संख्या नोंदवली आहे.

व्यस्त लिंक रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाणार्‍या 30 स्थानकांचा समावेश असलेल्या या दोन मेट्रो मार्गांमुळे वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा आहे.

'मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार

'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.


हेही वाचा

मोनो मार्गिका लवकरच मेट्रो आणि रेल्वेशी जोडली जाणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा