Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना मेस्मासह घरं खाली करण्याच्या नोटिसा; संप चिघळला

घरं खाली करण्याच्या आणि मेस्माच्या नोटिशीनंतर बेस्ट कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. तर आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर घर खाली करण्याच्या नोटिशीनंतर बेस्ट वसाहतीतील महिला आक्रमक झाल्या अाहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना मेस्मासह घरं खाली करण्याच्या नोटिसा;  संप चिघळला
SHARES

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेला बेमुदत संप अखेर दुसऱ्या दिवशीच चिघळला आहे. तोडगा निघत नसल्यानं संप सुरूच असून त्याचा मोठा आर्थिक फटका बेस्टला बसत आहे. त्यामुळे आता बेस्ट प्रशासनानं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३०० कर्मचाऱ्यांना बेस्टनं मेस्माच्या नोटीसा बजावल्या अाहेत. तर त्याचवेळी बेस्टकडून परळ, भोईवाडा येथील बेस्टच्या वसाहतीतील २००० कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याच्याही नोटिसा बजावण्यात अाल्याची माहिती बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


वसाहतीतील महिला आक्रमक 

घरं खाली करण्याच्या आणि मेस्माच्या नोटिशीनंतर बेस्ट कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. तर आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर घर खाली करण्याच्या नोटिशीनंतर बेस्ट वसाहतीतील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना घेराव घातला असून तिथं चांगलाच गोंधळ सुरू असल्याचंही राव यांनी सांगितलं आहे. बेस्ट प्रशासनानं कितीही कडक कारवाई करो, कर्मचारी त्याला घाबरणार नाहीत, प्रसंगी जेलमध्ये जायलाही कर्मचारी तयार असल्याची प्रतिक्रियाही राव यांनी दिली आहे.


अाधीच कारवाईचे संकेत

औद्योगिक न्यायालयानं बेस्ट कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली आहे. पण त्यानंतही बेस्टचे ३० हजारांहून अधिक कर्मचारी संपावर गेले अाहेत. बेस्ट प्रशासनानं याआधीच कर्मचाऱ्यांविरोधात मेस्माअंतर्गत कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार बेस्टनं कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटिसा पाठवण्यास सुरूवात केली आहे. तर  भोईवाडा बेस्ट वसाहतीतील इमारतींवर बेस्टच्या वेल्फेअर डिपार्टमेंटकडून घर खाली करण्यासंबंधीच्या नोटिसा लावल्या आहेत. त्यामुळे संप आणखी चिघळला अाहे. 



हेही वाचा - 

बेस्ट संप : ५०० गाड्या रस्त्यावर उतरवण्याचा दावा फोल




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा