Advertisement

अंधेरी महाकालजवळ बेस्ट बसचा अपघात

अंधेरी महाकाल परिसरात एका बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंधेरी महाकालजवळ बेस्ट बसचा अपघात
SHARES

अंधेरी महाकाल इथे एका बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बस महाकाल इथून अंधेरी स्थानकाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाला धडकली. उतारावर बस चालकाचे नियंत्रण न राहिल्याने बसचा अपघात झाला.

34 नंबरची ही बस होती. यामध्ये दुकानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक लोक जमा झाले होते. बस अपघात स्थळावरून काढून पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पीएसआय श्रीमती साळुंके हे प्रकरण हाताळत आहेत.



हेही वाचा

एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा