Advertisement

एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख

नागपूर ते मुंबई दरम्यानच्या एआय 630 या विमानात ही घटना घडली.

एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख
file photo
SHARES

एअर इंडियाच्या विमानात (Air India Aircraft) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चक्क विचंवाने डंख (Scorpion Bites) मारला. नागपूर ते मुंबई (Nagpur-Mumbai Flight) दरम्यानच्या एआय 630 या विमानात ही घटना घडली.

नागपूर विमानतळावरून विमान उड्डाण घेत असताना ही घटना घडली. विंचवाने डंख मारल्यानंतर महिलेने याबाबतची माहिती विमानातील क्रू मेंबरला दिली.

क्रू मेंबरने तात्काळ मुंबई विमानतळ (Mumabi Airport) व्यवस्थापनला देत इमरजेंसी मेडिकल पथक सज्ज ठेवण्यास सांगतिलं. मुंबई विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर तात्काळ त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

या घटनेवर एअर इंडिया व्यवस्थापनाने खेद व्यक्त केला आहे. यासंदर्भात एक कंपनीने एक पत्रही जारी केलं आहे. विमानातील प्रवाशाला विंचवाने डंख मारण्याची घटना अत्यंत दुर्देवी आणि दुर्मिळ आहे.

विमान मुंबई विमातळावर लँड होताच डॉक्टरांकडून महिलेची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  उपचारानंतर या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं या पत्रात सांगण्यात आलं.

आमच्या टीमने सर्व नियमांचं पालन केलं आहे. कंपनीचे अधिकारी त्या महिलेबरोबर रुग्णालयात गेले तसंच डिस्चार्ज मिळेपर्यंत तिच्याबरोबर होते, अशी माहितीही कंपनीने आपल्या पत्रात दिली आहे.

या घटनेनेनंतर एअर इंडियाच्या तज्ज्ञ पथकाने संपूर्ण विमानाचं निरिक्षण केलं. विमानात जंतू मारण्याचं औषध फवारण्यात आलं असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्ल एअर इंडिया कंपनी दिलगीर व्यक्त करत असल्याचंही कंपनीने म्हटलंय. 



हेही वाचा

ट्रेनच्या देखभालीसाठी वाणगाव आणि भिवपुरीत कारशेड उभारणार

मुंबईत धावत्या ट्रेनमधून तरुणाने काढली महिला पोलिसाची छेड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा