Advertisement

मुंबईत धावत्या ट्रेनमधून तरुणाने काढली महिला पोलिसाची छेड

पश्चिम रेल्वेवरीव वांद्रे रेल्वे स्थानकावर हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मुंबईत धावत्या ट्रेनमधून तरुणाने काढली महिला पोलिसाची छेड
SHARES

मुंबईच्या पश्चिम रेल्वे स्थानकावरील वांद्रे रेल्वे स्थानकावर (Bandra Station) महिला पोलीस कर्मचाऱ्याची (Police) छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये लोकल रेल्वेत बसून दोन तरुण कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची छेड करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पश्चिम रेल्वेवरीव वांद्रे रेल्वे स्थानकावर हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावरुन जाणाऱ्या लोकलमधून तरुणांनी गाडीच्या दारात बसून कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांची छेड काढली.

वांद्रे रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकलच्या दरवाज्यात खाली बसून या तरुणाने महिला पोलिसांची छेड काढत रील तयार केला आणि तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

क्युट पोलिसवाली धूम है मस्तान कंपनी असे या व्हिडीओवर तरुणाने लिहीले होते. यासोबत अश्लिल भाषेत हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी रेल्वे पोलिसांना टॅग करत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

https://twitter.com/YOGibhai4091/status/1635387185066311680?t=rNDHpCgb7CLDVw0_ak64QA&s=19

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

जीवनधारा संघ नावाच्या संस्थेने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. "मुंबई पोलीस दिवसाचे 24 तास, वर्षातील 365 दिवस आपल्या सेवेत असतात. अशा परिस्थितीत काही लोक मस्तान कंपनीच्या नावाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून महिला पोलिसांशी गैरवर्तन करत आहेत. महिलांचा अपमान व विनयभंग करणाऱ्यांना धडा शिकवावा," असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा