पुन्हा सुरू होणार गेट वे ते सीएसएमटी दरम्यान एसी बससेवा

बेस्ट प्रशासन लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) ते गेट वे आॅफ इंडिया (get way of india) दरम्यान बंद केलेली मिनी एसी बससेवा पुन्हा सुरू करणार आहे.

पुन्हा सुरू होणार गेट वे ते सीएसएमटी दरम्यान एसी बससेवा
SHARES

बेस्ट प्रशासन लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) ते गेट वे आॅफ इंडिया (get way of india) दरम्यान बंद केलेली मिनी एसी बससेवा पुन्हा सुरू करणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बेस्टने काही दिवसांपूर्वीच ए १०१ (best bus A 101) क्रमांकाची ही मिनी एसी बससेवा बंद केली होती. 

सीएसएमटी ते एस.पी.मुखर्जी चौक (म्युझिअम एरिआ) दरम्यान धावणारी ही बस सेवा १९ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली होती. प्रवासी संख्या जास्त नसल्याने ही बस सेवा बंद करण्यात आल्याचं बेस्टकडून (BEST) सांगण्यात आलं होतं. शिवाय बस स्टाॅपला लागूनच टॅक्सी (share taxi) चालक शेअर टॅक्सी चालवत असल्याने या बसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी बेस्टने या मार्गावरील बस ए १११ क्रमांकाच्या मार्गावर वळवल्या.

ही बस सेवा बंद झाल्याचा मोठा फटका या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना बसला. त्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी त्यांची मागणी होती. या मार्गासाठी केवळ ५ रुपये तिकीट आकारण्यात येत होतं. तर शेअर टॅक्सीसाठी प्रत्येक प्रवाशाला २० रुपये सीट भाडं द्यावं लागत आहे. अखेर या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाने ही सेवा पूर्ववत करण्याची तयारी दाखवली आहे.  

संबंधित विषय