Advertisement

सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशी बेहाल


सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशी बेहाल
SHARES

बेस्टच्या संपावर अजूनही तोडगा न निघाल्याने सलग तिसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. त्यात बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा बडगा उचलल्याने संप मिटण्याची शक्यता कमी झाली असून संप चिघळला आहे. आता सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष केवळ हा संप कधी मिटणार याकडंच लागले आहेत.


एकही बस नाही

बेस्ट संप मिटवण्यासाठी बुधवारीही वाटाघाटी झाल्या. मात्र यातूनही तोडगा निघालेला नाही. गुरुवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजेपर्यंत कामावर केवळ १ वाहक आणि ३ चालक कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही कोणत्याही डेपोतून एकही बेस्ट बस बाहेर पडलेली नाही. त्यात बेस्ट प्रशासनाने मेस्मा अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर ३५० कर्मचाऱ्यांना बडतर्फही केलं आहे. इतकच नव्हे तर कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील निवासस्थान खाली करण्याच्याही नोटिसा पाठवल्या आहेत.


कुटुंबीय आक्रमक 

या कारवाईनंतर बेस्ट कर्मचारी आणखी आक्रमक झाले आहेत. बेस्ट कृती समितीने आता तोडगा निघाल्याशिवाय माघार नाहीच असा इशारा दिला आहे. तर संप चिघळण्याची शक्यता आता वाढली आहे. कारण निवासस्थान खाली करण्याच्या कारवाईमुळे आता बेस्ट कर्मचारीच नव्हे तर त्यांचे कुटुंबियही आक्रमक झाले आहेत. त्यानी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यानुसार गुरुवारी एक मोठा मोर्चा निघणार आहे .दरम्यान तोडगा काढण्यासाठी सकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघावा अशीच अपेक्षा आता मुंबईकर करत आहेत.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा