SHARE

एसटीच्या पाठोपाठ आता 'बेस्ट'नेही लग्न समारंभासाठी भाड्याने बेस्टचा पर्याय खुला केला आहे. मुंबईकरांना लग्नाला न्यायला गाडी मिळत नसेल तर यजमान्यांना बेस्टच्या गाड्या सहज उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे वाजवी दरात या बेस्ट बस भाड्याने देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. तसेच मागणीनुसार सिंगल आणि डबलडेकर बस भाडे तत्वावर मिळू शकणार आहेत. लग्न समारंभाव्यतिरिक्त चित्रीकरणासाठीही बेस्ट बस मिळणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बेस्टची बस हवी असेल तर बेस्टच्या 1800 227550 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन 'बेस्ट'ने केले आहे.

सिंगल बससाठी भाडं पुढील प्रमाणे -
एका दिवसाला - 13 हजार 800 रुपये
अर्ध्या दिवसासाठी - 6 हजार 900 रुपये

बेस्टच्या डबलडेकर निलांबरी बससाठी भाडे -
एका दिवसाला - 23 हजार रुपये
अर्ध्या दिवसाला - 14 हजार 376 रुपये

संबंधित विषय
ताज्या बातम्या