Advertisement

बेस्टचे प्रवाशी वाढले, टॅक्सीचे भाडे घटले!


बेस्टचे प्रवाशी वाढले, टॅक्सीचे भाडे घटले!
SHARES

चर्चगेट -  चर्चगेट ते गेट वे ऑफ इंडिया या प्रवासासाठी मुजोर टॅक्सीचालकांकडून अव्वाच्यासव्वा भाडेआकारणी केली जायची. देश-विदेशातील प्रवाशांकडून जादा भाडे आकारून त्यांना लुटण्याचा प्रयत्न हे मुजोर टॅक्सीचालक करत असतात. यावर उपाय म्हणून आता बेस्टने पुढाकार घेतला आहे. चर्चगेट ते गेट वे ऑफ इंडिया प्रवासाठी बेस्टचा तिकिट दर हा 10 रुपये इतका आहे. अनेक प्रवाशांना याची माहितीच नसते, यामुळे आता बेस्टकडून उद्घोषणा करून याची माहिती दिली जात आहे. परिणामी या मार्गावरील बेस्टच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे.
बेस्टने अशी भूमिका घेतल्यामुळे टॅक्सीचालक वठणीवर आले आहेत. आता त्यांनीही आधी घेतले जाणारे 20 ते 30 रूपये शेअर टॅक्सीचे भाडे 10 रुपये इतके केले आहे. चर्चगेट ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील शेअर टॅक्सीचे भाडे अचानक 10 रुपये का केले? याविषयी टॅक्सीचालक काहीच बोलायला तयार नसले तरी बेस्टने घेतलेल्या एका चांगल्या भूमिकेमुळे प्रवाशांचा मात्र फायदा झाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा