Advertisement

मेट्रो मार्गासाठी ‘फीडर रूट’ सुरू करण्याचे बेस्टचं नियोजन

बेस्टनं येत्या काही महिन्यांत प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या धावत असलेली मेट्रो आणि येणाऱ्या नवीन मेट्रो मार्गासाठी ‘फीडर रूट’ सुरू करण्याचे नियोजन केलं आहे.

मेट्रो मार्गासाठी ‘फीडर रूट’ सुरू करण्याचे बेस्टचं नियोजन
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. कारण बेस्टनं येत्या काही महिन्यांत प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या धावत असलेली मेट्रो आणि येणाऱ्या नवीन मेट्रो मार्गासाठी ‘फीडर रूट’ सुरू करण्याचे नियोजन केलं आहे. मेट्रो रेल्वे स्थानक ते एखाद्या रहिवासी परिसर किंवा कार्यालयीन परिसरापर्यंत आणि तेथून परत बस फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

या सेवेमुळे मेट्रो स्थानकाकडं जाणाऱ्या आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. परिणामी, बेस्ट उपक्रमाच्याही प्रवासी उत्पन्नात भर पडेल. कोरोनाकाळात सुरू असलेली बस सेवा बेस्ट उपक्रमानं अद्यापही कायम ठेवली आहे. मुंबईतील काही मार्गामध्ये १ सप्टेंबरपासून बदलही करण्यात आले. विविध मार्गावरील बस थांब्यांवर प्रवाशांना अर्धा ते पाऊणतास बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे १५ मिनिटांत बस उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या मार्गामध्ये बदल केल्याचे बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे.

बेस्ट उपक्रमानं आता फीडर रूट सेवांवरही लक्ष्य केंद्रित केले आहे. प्रवासी वाढवण्यासाठी उपक्रमानं गेल्या काही महिन्यांत रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेकडून रहिवासी आणि कार्यालयीन परिसरासाठी बस (फीडर रूट) सेवा सुरू केल्या आहेत. जवळपास २०६ मार्गावर १,३६० बस चालविण्यात येत आहेत. आता रेल्वे स्थानकाप्रमाणेच मेट्रो स्थानके ही बेस्टशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याप्रमाणे नियोजन केल्याचं समजतं.

‘मेट्रो २ ए’मधील (दहिसर ते डी. एन. नगर) डहाणूकरवाडी ते आरे रोड आणि ‘मेट्रो ७’मधील (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) दहिसर ते आरे हे टप्पे मार्च २०२२ पर्यंत किंवा त्याआधी प्रवाशांच्या सेवेत येतील. तसेच सध्या घाटकोपर ते अंधेरी ते वर्सोवा मेट्रोही धावत असून त्यांच्यासाठी फीडर रूट सेवा नाही. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेकडून एखाद्या गर्दी व जास्त मागणी असलेल्या परिसरासाठी आणि तेथून परत मेट्रोसाठी बस गाड्या चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळते.

त्यानुसार मार्गही शोधण्यात आले आहेत. मेट्रो रेल्वे स्थानकांना बेस्टची जोड देण्यासाठी सुमारे १७५ नवीन मार्गावर येत्या काही महिन्यांत टप्प्याटप्याने बस सुरू होतील, असे चंद्र यांनी स्पष्ट केले. त्यासाठी २७१ बसची गरज असून ३९ बस या मार्गासाठी प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. त्यानुसार नियोजन होत आहे.



हेही वाचा -

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा