Advertisement

बेस्ट पर्यटकांसाठी 'ही' नवी सुविधा सुरू करणार

बेस्टनं प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण बेस्ट आता एक नवी सुविधा सुरू करत आहे.

बेस्ट पर्यटकांसाठी 'ही' नवी सुविधा सुरू करणार
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण बेस्ट आता एक नवा उपक्रम सुरू करत आहे. 'होप ऑन, होप ऑफ (हो-हो)' बस हा उपक्रम सुरू करणार आहे. 'होप ऑन, होप ऑफ (हो-हो)' बस हा उपक्रम म्हणजे पर्यटक त्यांचं ठिकाणाची निवड करू शकतील, त्यानंतर बसमधून उतरून त्या ठिकाणाला भेट देऊ शकतील आणि पुढील मार्गावर परत येऊ शकतील.

ही सेवा सीएसएमटी आणि जुहू बीच या मार्गावर सुरू करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसी इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवासासाठी एक विशेष तिकीट असले. हे तिकीट बुक-माय-शो या ऑनलाइन तिकीट सेवेद्वारे बुक करता येईल.

बेस्टची ही सेवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासेवेसाठी सीएसएमटी, बीएमसी मुख्यालय, क्रॉफर्ड मार्केट, जेकब सर्कल, महालक्ष्मी रेसकोर्स, प्राणिसंग्रहालय, सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, माहीम, महापौर बंगला, वांद्रे रेक्लेमेशन, बँड स्टार बंगला, बँड स्टार बंगला, लिंकिंग रोड, जुहू चौपाटी, सी लिंक, नेहरू सायन्स सेंटर, हाजी अली, पेडर रोड, मणि भवन, बाबुलनाथ मंदिर, हँगिंग गार्डन, वानखेडे स्टेडियम, मत्स्यालय, मंत्रालय, नरिमन पॉइंट, म्युझियम आणि गेटवे या ठिकाणांचा समावेश केला जाणार आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा