Advertisement

सलग चौथ्या दिवशी संप सुरु, बेस्टचा हा दशकातील सर्वात मोठा संप


सलग चौथ्या दिवशी संप सुरु, बेस्टचा हा दशकातील सर्वात मोठा संप
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले संप आता आणखीनच चिघळत चालला आहे. बेस्ट संपाचा शुक्रवारी चौथा दिवस असून लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. बेस्टचा हा दशकातील सर्वात मोठा संप आहे. दरम्यान बेस्ट संपाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशी महापौर, पालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि कर्मचारी संघटना यांच्यात झालेली बैठक देखील निष्फळ ठरली. कोणताही तोडगा निघू शकलेला नसल्यामुळं सलग चोथ्या दिवशी नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपात स्वतः लक्ष घालूनही कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळं अपयशी ठरलेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तोडगा निघाला नाही तेर या संपात उद्यापासून महापालिकेचे सफाई, मलनिस्सारण कर्मचारी रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे.

विद्युत पुरवठाच्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गुरुवारी तोडगा निघाला नाही, तर मुंबई शहरात बेस्ट वीजपुरवठ्याची वीज गुल होण्याची शक्यता आहे. तसंच, विद्यूत पुरवठा कर्मचारी, विद्युत पुरवठा विभागातील स्ट्रीट लाईट पाहणी, दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्ग गुरुवारी संध्याकाळपासून संपावर जाण्याची हाक दिली आहे. बेस्टचं कार्यालयीन/प्रशासकीय कामकाज करणार क्लार्क स्टाफही संपावर जाणार आहेत.

याचिकेवर सुनावणी

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अ‍ॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस धाडत शुक्रवारी (११ जानेवारी) सकाळी यावर तातडीची सुनावणी ठेवली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा