Advertisement

बेस्ट संपाचा सातवा दिवस, प्रवाशांचे अतोनात हाल

गेल्या मंगळवारपासून सुरू झालेला बेस्टचा संप अजूनही कायम आहे. बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत.

बेस्ट संपाचा सातवा दिवस, प्रवाशांचे अतोनात हाल
SHARES

गेल्या मंगळवारपासून सुरू झालेला बेस्टचा संप अजूनही कायम आहे. बेस्ट संपाचा आज सातवा दिवस असून मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. दरम्यान संपाबाबत दाखल याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे.

बैठकीत तोडगा नाहीच

बेस्ट संपावर मंत्रालयात उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती, कामगार कृती समिती आणि बेस्ट प्रशासनाचा यांच्यात सोमवारी झालेली बैठकही निष्फळ ठरली आहे. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र कोणताही तोडगा या बैठकीत निघालेला नाही. दरम्यान संपाबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळं सुनावणीदरम्यान न्यायालय कोणता आदेश देणार याकडे आता कर्मचारी आणि लाखो मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

आता मनसेनं देखील संपात उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी १०.३० वाजता वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दरम्यान सोमवारपर्यंत तोडगा काढला नाही तर मुंबईत तमाशा करू, असा इशारा मनसेनं बेस्ट प्रशासनाला दिला होता.


चर्चेतून मार्ग काढू - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपाबाबत चर्चेतूनच मार्ग काढूया, असे आवाहन रविवारी केले. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र, अवाजवी मागण्या केल्या तर आणखी समस्या निर्माण होतील, असे ठाकरे म्हणाले. संपावर असलेल्या एकाही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी विविध मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत


हेही वाचा

...नाही तर सोमवारी मुंबईत तमाशा होईल - संदीप देशपांडे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा