Advertisement

...नाही तर मुंबईत तमाशा होईल - संदीप देशपांडे

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये पाचव्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या संपावर सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही, तर मुंबईतील रस्त्यांवर तमाशा होईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

...नाही तर मुंबईत तमाशा होईल - संदीप देशपांडे
SHARES

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये पाचव्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या संपावर सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही, तर मुंबईतील रस्त्यांवर तमाशा होईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.


चर्चा, बैठका निष्फळ

संपामुळं लाखो मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारी संपाच्या पाचव्या दिवशीही सर्व  ठरल्या आहेत. याउलट या संपाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतल्याने बाब अधिकच गंभीर बनली आहे.


सत्ताधारीच जबाबदार

जोपर्यंत बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. संपावर तोडगा निघाला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यावर तमाशा होईल आणि यासाठी प्रशासन व सत्ताधारीच जबाबदार असतील, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.


अन्याय होऊनही संप नाही

संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असले तरी कोणालाही त्रास व्हावा अशी कोणत्याही कर्मचाऱ्याची इच्छा नाही. आजवर अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधीच संप पुकारला नाही. त्यामुळे मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं आहे. शनिवारी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वडाळा डेपोतील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशा शब्दांत देशपाडे यांनी ठणकावलं आहे.


अंत पाहू नये

बेस्ट प्रशासन कामगारांना घर खाली करण्याच्या नोटीस पाठवत असेल, तर आमचाही नाईलाज आहे. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, अधिकाऱ्यांनी आम्हाला घाबरवू नये, स्वत:च्या पायावर बाहेर पडायचं असेल, तर आमच्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराही देशपांडे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.



हेही वाचा -

बेस्ट बसचं भाडं वाढणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा