Advertisement

मुंबईत बेस्टच्या 400 CNG बसेसची सेवा तात्पुरती बंद, वेळापत्रक कोलमडणार

बसमध्ये वाढत्या आगीच्या घटना पाहता बेस्टने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईत बेस्टच्या 400 CNG बसेसची सेवा तात्पुरती बंद, वेळापत्रक कोलमडणार
SHARES

बेस्ट बसमध्ये (best bus fire) आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत बेस्टच्या तीन बसेसना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच अंधेरी (Andheri) स्टेशनबाहेर एका बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली. (Best Bus news)

बेस्टने घेतला मोठा निर्णय

बसमध्ये वाढत्या आगीच्या घटना पाहता बेस्टने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्टने ४०० CNG बसेस (CNG Bus) मुंबईच्या रस्त्यावरून हटवल्या आहेत. यासंदर्भात बेस्ट बस ट्रान्सपोर्टकडून ट्विटरद्वारे माहिती देण्यात आली आहे.  (Transport news)

...म्हणून घेतला निर्णय

बेस्टने (BEST) त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, M/S मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड द्वारा संचालित TATA CNG बसेसमध्ये आग लागण्याच्या अलीकडील घटना लक्षात घेता, BEST ने भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खात्री करण्यासाठी OEM आणि ऑपरेटर आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना करेपर्यंत या सर्व 400 बसेस रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टचे वेळापत्रक बदलणार

त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी बेस्टसाठी सार्वजनिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि आम्ही त्याबाबत तडजोड करू शकत नाही. यामुळे वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात. पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी हे लक्षात ठेवावे.

ट्विटमध्ये वेळापत्रकात बदल होणार असे म्हटले आहे. पण अद्याप बेस्टकडून नवीन वेळापत्रक किंवा कुठल्या बसेस रद्द आणि त्याचे नवीन वेळापत्रक दिले नाही. 



हेही वाचा

अंधेरीत बेस्ट बसला आग, बस जळून खाक

पुढील 18 महिन्यांत मुंबईहून आणखी 4 रो-रो सेवा सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा