फुकट्या प्रवाशांना बेस्टचा दणका


SHARE

मुंबई - लोकलप्रमाणे बेस्टमधून फुकटात प्रवास करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. बेस्ट प्रशासनाने जुन, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2016 या चार महिन्यांत 27,022 फुकट्या प्रवाशांना दणका दिला आहे. खरेदी केलेल्या तिकीटानुसार जास्त अंतर प्रवास करणाऱ्या तसंच तिकीट न काढताच फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा यात समावेश आहे. या फुकट्या प्रवाशांकडून बेस्टने 23,71, 981 इतका दंड वसुल केला आहे.

विना तिकीट वा खरेदी तिकीटापेक्षा अधिक अंतर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची तरतुद बेस्ट कायद्यात आहे. त्यानुसार तिकीटाच्या दहापट रक्कम फुकट्या प्रवाशांकडून वसुल केली जाते. दंडासह एक महिन्यांची पोलिस कोठडी वा 200 रुपयांचा दंड अशी शिक्षा कायद्यात आहे. फुकट्या प्रवाशांना रोखत बेस्टचा महसुल वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बेस्टने कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार 27, 022 फुकट्या प्रवाशांना दणका दिल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे. तर प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करून नये असे आवाहनही बेस्टने केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या