Advertisement

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या विविध सुविधा

येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर, १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. या काळात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या विविध सुविधा
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांना अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर, १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. या काळात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी बेस्ट बसनं प्रवास करतात. बऱ्याच पासधारक विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र व निवासस्थानातील अंतर दूर असल्यानं त्यांना नवीन तिकीट काढावं लागतं. यासाठी विद्यार्थ्यांचा अतिरीक्त वेळ जातोच, पण त्यासोबतच कित्येकदा त्यांना नाहक त्रासही सहन कारावा लागतो. यापासून विद्यार्थ्यांची मुक्तता व्हावी यासाठी, बेस्टनं बोर्डाच्या परीक्षा कालावधीत प्रवासी तिकीट न काढता प्रवास करण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यानुसार, बेस्ट पासधारक विद्यार्थ्यांचे बस पासेस त्यांचं निवासस्थान आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील.


सवलतीचं भाडं

परीक्षा कालावधीमध्ये महापालिकेच्या ज्या विद्यार्थ्यांकडे बस पास उपलब्ध नसतील त्यांना परीक्षा केंद्राच्या प्रवेशपत्रावरील शाळेचा शिक्का पाहून प्रवास करू दिला जाईल. या अंतर्गत संबंधित विद्यार्थी महापालिकेच्या शाळेचा असल्याची खात्री करून पूर्ण प्रवास भाडं न आकारता सवलतीचं भाडं आकारण्यात येईल.


बस थांब्यांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती

बस प्रवासादरम्यान बसमध्ये चढताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी, विद्यार्थ्यांना बसच्या पुढच्या दरवाजाने बसगाडीत चढण्याची मुभा राहील. तसंच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी, गर्दीच्या बस थांब्यांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, शालेय प्रशासनाकडून सूचना मिळाल्यास अतिरिक्त बसगाड्यांचं प्रवर्तन देखील करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

माथेरानच्या मिनी ट्रेनला व्हिस्टाडोमची मोहिनी

युवा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉचं लवकरच पुनरागमन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा