Advertisement

बेस्टच्या ताफ्यात आणखी ४० इलेक्ट्रिक बस


बेस्टच्या ताफ्यात आणखी ४० इलेक्ट्रिक बस
SHARES

बेस्टच्या ताफ्यात ४० इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. पर्यावरणपूरक प्रवासासाठी बेस्ट बस इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या 'फेम' योजनेंतर्गत देशभरातील विविध राज्यांत इलेक्ट्रिक बससाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे. त्याअंतर्गत बेस्ट उपक्रमात आणखी ४० इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत. 

बेस्टच्या ताफ्यात 'फेम'अंतर्गत सुमारे ३०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या 'फेम-२' अंतर्गत महाराष्ट्रात बेस्ट, एसटी, नवी मुंबई परिवहन सेवा, गोवा, गुजरातमध्ये राजकोट, सुरत आणि चंदीगडमध्ये ६७० इलेक्ट्रिक बस पुरविण्याचे जाहीर केले आहे. त्यात बेस्टच्या वाट्याला ४० बस येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यापूर्वीच्या ३०० इलेक्ट्रिक बसमध्ये आणखी ४० बसची सेवा उपलब्ध होणार आहे. 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातंर्गत 'फेम' (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) योजना आखलेली आहे. त्यानुसार राज्यांना इलेक्ट्रिक बससाठी सबसिडी दिली जाते. बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बस असून, त्यात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसची भर पडणार आहे. तर, सध्या बेस्टच्या स्वत:च्या सहा इलेक्ट्रिक बस असून ३२ बस या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय