Advertisement

गुरुवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर


गुरुवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर
SHARES

ट्रॅफिकने त्रासलेल्या तसेच पावसाळ्यात सतत रखडणाऱ्या रेल्वेच्या प्रश्नांचे उत्तर सापडत नसतानाच मुंबईकरांसमोर आता बेस्ट बसेसच्या संपाचे संकट उभे राहिले आहे.

वेळेवर पगार मिळत नसल्याने बेस्ट कर्मचारी चिंतेत असताना मे महिन्याचा पगार देखील अर्धाच मिळणार असल्याने गुरुवारी 22 जूनच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे 36 हजार कर्मचारी संपवार जाणार आहेत. सोमवारी बेस्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी शासनाला हा इशारा दिला आहे.

मे महिन्याचा पगार 2 तारखेपर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता प्रशासनाने 20 तारखेला अर्धा पगार देण्याचे आश्वासन दिले आहे. पण उरलेला अर्धा पगार कधी मिळणार याबद्दल अजूनही आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे सोमवारी कर्मचाऱ्यांनी बैठक घेतली. यामध्ये गुरुवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण पगार न आल्यास 22 जूनपासून संपावर जाणार असल्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.

औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगारांना 20 जून 2017 रोजी केवळ अर्धा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट प्रशासनाची ही कृती बेस्ट कामगारांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.
शशांक राव, अध्यक्ष, बेस्ट वर्कर्स युनियन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा