Advertisement

भाऊचा धक्का ते मांडवा 'रो पॅक्स फेरी' सेवा लवकरच होणार सुरु

भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो पॅक्स फेरी सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता केवळ ४५ मिनिटात मांडव्याला पोहोचता येणार आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा 'रो पॅक्स फेरी' सेवा लवकरच होणार सुरु
SHARES

आलीबाग (Alibaug) फिरण्यासाठी भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) ते मांडवा या जलवाहतूक मार्गानं प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भाऊचा धक्का ते मांडवा (Mandawa) अशी रो पॅक्स फेरी (Ro packs feri) सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता केवळ ४५ मिनिटात मांडव्याला पोहोचता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुधवारी फेरी सेवेच्या कामाचा आढावा घेतला.

विधान भवनात (Vidhan Bhawan) झालेल्या याबाबतच्या बैठकीला (Meeting) मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामास्वामी एन., कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मांडवा ते अलिबाग या २१ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

या सुचना केल्या

  • मांडवा जेट्टी येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.
  • मांडवा जेट्टीजवळील अतिक्रमण दूर करण्यात यावे.
  • वाहनतळाचा विस्तार करण्यात यावा.
  • स्वच्छतागृहे व प्रथमोपचार इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाऊचा धक्का ते मांडवा रो- पॅक्स फेरी सेवा पावसाळ्यातही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर रस्तामार्गे गेल्यास १०९ किलोमीटर इतकं असून, त्यासाठी ३ तास लागतात. मात्र, भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स फेरी सेवेद्वारे जलमार्गानं (Water Transport) प्रवास केल्यास केवळ पाऊण तासात हे अंतर पार करता येवू शकणार आहे.

प्रवाशांचा वेळ तसंच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचं बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) मार्फत करण्यात आलेलं असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचं बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (Maharashtra Maritime Board) मार्फत करण्यात आलं आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.



हेही वाचा -

सायन उड्डाणपूल शुक्रवारपासून ३ दिवस बंद

जोगेश्वरीत गोदामाला भीषण आग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा