Advertisement

मेट्रो स्थानकाबाहेरील सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

मेट्रो स्थानकाबाहेरील सायकल सेवेला मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आठवड्याभरामध्येच तब्बल ५०९ जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

मेट्रो स्थानकाबाहेरील सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
SHARES

मेट्रो-१ मार्गावरील वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर असलेल्या जागृतीनगर स्थानकात सायकल सेवेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या सायकलनं मेट्रो स्थानकापासून थेट घर किंवा कार्यालय गाठता येते. त्यामुळं या सायकल सेवेला मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सेवेला सुरुवात झाल्यावर आठवड्याभरामध्येच तब्बल ५०९ जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

या सायकल सेवेमुळं वाहतूककोंडीतून सुटका आणि प्रवास खर्चामध्ये बऱ्यापैकी बचत होत असल्याने आणि थेट घर किंवा कार्यालयापर्यंत प्रवास करता येत असल्यानं प्रवाशांकडून सायकल सेवेला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरदिवशी सायकलच्या वापरामध्ये वाढ होत आहे. एमएमआरडीए आणि माय बाइक यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सध्या या स्थानकात पहिल्या टप्प्यात ५० सायकली उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या सायकल सेवेच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांनी कुतूहल म्हणून सायकली भाड्यानं घेतल्या. मात्र, आता या सायकली प्रवाशांची गरज बनल्या आहेत. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं अधिक सायकली (Cycle) उपलब्ध करण्याचा विचार माय बाइक (My Bike) कंपनीकडून सुरू करण्यात आला असल्याची माहिती मिळते. दरदिवशी या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. उर्वरित स्थानकांवरही लवकरच ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

उर्वरित मेट्रो स्थानकांवरही (Metro Station) ही योजना सुरू झाल्यावर आमचा उद्देश पूर्ण होणार आहे. मुंबईकर या योजनेला चांगला प्रतिसाद देत आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जागृतीनगर हे एकच मेट्रो स्थानक निवडण्यात आलं. सध्या ५० सायकली उपलब्ध आहेत. लवकरच मेट्रो-१ मार्गावरील सर्व स्थानकांसाठीदेखील ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

सायकल एका ठिकाणाहून घेऊन दुसऱ्या ठिकाणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास प्रतिसादात वाढ होणार आहे. सध्या केवळ एकच स्थानक आणि एकच सायकल स्टॅण्ड (Cycle Stand) असला, तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार इतर स्थानकं आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी सायकल सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

दरपत्रक

  • प्रतितास दोन रुपये
  • साप्ताहिक पास २८० रुपये
  • मासिक पास ९०० रुपये
  • दोन महिन्यांच्या पासवर एक महिना मोफत
  • साप्ताहिक आणि मासिक पास घेतल्यास सायकल मुक्कामी घेऊन जाण्याची मुभा.
  • माय बाइक या अ‍ॅपच्या वॉलेटमध्ये किमान पाचशे रुपये शिल्लक असणं गरजेचं.



हेही वाचा -

आयसीआयसीआय बॅंकेचा बेस्टसोबत असलेला 'हा' करार संपुष्टात

‘जीएसटी’सहीत पक्के बिल दाखवा आणि एक कोटी जिंका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा