Advertisement

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची मदत

केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणून आतापर्यंत ७२ कोटी रुपयांची रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची मदत
SHARES

कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारला मदत म्हणून आतापर्यंत अनेकांनी आर्थिक मदत केली आहे. त्याचप्रमाणं आता रेल्वेनंही आर्थिक मदत करत सरकारला मदतीचा हात दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणून आतापर्यंत ७२ कोटी रुपयांची रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आर्थिक साहाय्य केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. 

कोरोनाशी सामना करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मास्क बनविणे, सॅनिटायझर तयार करणे सुरु आहे. यासह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना अन्न पुरवठा, जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला जात आहे. ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशन, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक साहाय्य म्हणून ७१ कोटी ७७ लाखांची रक्कम देण्यात आली आहे.

ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशनच्या सर्वाधिक रक्कम देण्यात आली आहे. असोशियनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत निधी म्हणून ७० कोटी रुपये दिले आहेत. ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशनच्या ३.५० लाख कर्मचाऱ्यांचा मासिक वेतनातील एका दिवसाचा पगार मदत म्हणून पंतप्रधानांना दिला आहे. 

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून केंद्र आणि राज्य सरकारला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात व  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला ५० लाख तर केंद्र सरकारला ५० लाख रुपये असे एक कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील एक दिवसाचा पगार मदत निधीसाठी देण्यात येणार आहे.

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनकडून केंद्र आणि राज्य सरकारला एकूण ७७ लाखांची मदत करण्याचे घोषित केले आहे. आर्थिक निधी साहाय्य म्हणून 'पीएम केअर फंड' मध्ये ५२ लाख रुपये आणि 'महाराष्ट्र सीएम वेल्फेअर फंड'  यामध्ये २५ लाख रुपये मदत म्हणून दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा