बेस्टचं किमान तिकीट ५ रुपये - पालिका आयुक्त

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी जाहीर केले आहेत.

SHARE

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी जाहीर केले आहेतबेस्ट बसचा ताफा ६ हजारांवर नेणं, बेस्टचं किमान तिकीट ५ रुपये करणं, वातानुकूलित बस नव्यानं दाखल करणे, गर्दीच्या मार्गावर १५०० एसी बस, अॅपआधारित सेवा, बस कधी येणार याची माहिती देणारं तंत्रज्ञान यांसारखे महत्वाचे निर्णय पालिका आयुक्तांनी घेतले. या सुविधांचा लाभ प्रवाशांना ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार असल्याचं देखील प्रवीण परदेशी यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत  स्पष्ट केलं.


बेस्टच्या ताफ्यात वाढ

बेस्टच्या ताफ्यात सद्दस्थितीत ३३३७ बस आहेत. त्या ६ हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. तसंच, भविष्यातील बेस्टचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. त्याशिवाय, ताफ्यात येणाऱ्या या नवीन बस एसी असणार आहेत. बेस्टच्या भाड्यात कमी अंतरासाठीचं तिकीट ५ रुपये करण्यात येणार असल्याचंही परदेशी यांनी स्पष्ट केलं.


मोफत बससेवा

मेट्रो सेवांनी बेस्टच्या मार्गांवर परिणाम झाला आहे. त्यामुळं 'फीडर सेवा' वाढविणार असल्याचं स्पष्ट केलं. मेट्रो थांब्याकडून जवळच्या अंतरासाठी प्रायोगिक तत्त्वावर मोफत बससेवा चालविण्यात येणार असल्याचं देखील पालिका आयुक्तांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. हेही वाचा -

अनाथांची नाथ बनली तेजस्विनी

मुंबईत ठिकठिकाणी झाडं कोसळून ३ जणांचा मृत्यूसंबंधित विषय