Advertisement

जी नॉर्थ विभागात 'नो पार्किंग'मध्ये पालिकेच्याच गाड्या पार्क

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील जे. के. सावंत मार्गावर पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या पार्क केल्या आहेत. याबाबत 'मुंबई लाइव्ह'नं येथील स्थानिकांशी बातचित केली. त्यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात पालिकेवर टीका केली.

SHARES

मुंबईत महापालिकेनं अवैध्य पर्किंगला आळा घालण्यासाठी 'नो पार्किंग'चा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पालिका 'नो पार्किंग'च्या नावाखाली मुंबईकरांकडून जबर दंड वसूल करत आहे. मात्र, हा नियम पालिकाच पाळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागातील जे. के. सावंत मार्गावर पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या पार्क केल्या आहेत. याबाबत 'मुंबई लाइव्ह'नं येथील स्थानिकांशी बातचित केली. त्यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात पालिकेवर टीका केली.


पर्यायी व्यवस्था करू

या अवैध पार्किंगप्रकरणी जी उत्तर विभागातील दुय्यम अभियंता संदीप कदम याच्याशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी या कचऱ्याच्या गाड्यांबाबत पर्यायी व्यवस्था करू अस आश्वासनं दिलं. मात्र, स्थानिकांनी 'जर पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही, तर नो पार्किंग निर्णय लागू का केला?’ असा सवाल विचारला.

२३ लाखांची दंडवसुली

'नो पार्किंग झोन'मध्ये गाडी पार्क केल्यास पालिका ५ ते २५ हजारांपर्यंत दंड वसूल करत आहे. ७ जुलैपासून महापालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली असून ७ दिवसांत २३ लाखांची दंडवसुली केली आहे. सर्वात जास्त दंडवसुली ९ जुलै रोजी करण्यात आली आहे. यादिवशी महापालिकेनं १०७ वाहनांचे टोचन (टो) केलं होतं. त्यांच्याकडून एकूण ५.२ लाखांचा दंड वसूल कऱण्यात आला.हेही वाचा -

नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानं महापौरांना पाठवलं ई-चलान

‘नो पार्किंग’चा जबर दंड की तोंड दाबून बुक्क्यांचा मार?Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा