Advertisement

मुंबई मेट्रोच्या 'या' ८ स्थानकांना महापालिकेची नोटीस

मुंबई मेट्रोच्या आठ मेट्रो स्थानकांना महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे.

मुंबई मेट्रोच्या 'या' ८ स्थानकांना महापालिकेची नोटीस
SHARES

मुंबई मेट्रोच्या आठ मेट्रो स्थानकांना महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे. मुंबई मेट्रो १ ने २०१३ पासून कोट्यावधींचा मालमत्ता कर थकवला आहे. थकबाकीची रक्कम जमा केली नाही तर मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

तर, या करवाईनंतरही कर भरला नाही तर मलनिस्सारण वाहिनीही खंडित करण्याचा इशारा मुंबई महापालिकेनं दिला आहे. थकीत कराची रक्कम २१ दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

‘या’ आठ स्थानकांचा समावेश आहे.

  • मेट्रोच्या नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक (Azad Nagar Metro Station)
  • डी. एन. नगर मेट्रो स्थानक (D N Nagar Metro Station)
  • वर्सोवा मेट्रो स्थानक (Versova Metro Station)
  • एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक (LIC Andheri Metro Station)
  • पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक (Western Express Highway Metro Station)
  • जे. बी. नगर मेट्रो स्थानक (JB Nagar Metro Station)
  • एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक (Airport Road Metro Station)
  • मरोळ नाका मेट्रो स्थानक (Marol Naka Metro Station)

मुंबई महापालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण आणि संकलन विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर ही नोटीस चिकटवली आहे. यात के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे.



हेही वाचा

मेट्रो स्थानकांच्या बाहेरही उपलब्ध होणार सायकल सेवा?

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलची ६९ लाखांची कमाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा