Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर

मुंबईतील कोरोना संख्या नियंत्रणात यावी, यासाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर
SHARES

मुंबईतील कोरोना (coronavirus) संख्या नियंत्रणात यावी, यासाठी मुंबई महापालिकेकडून (bmc) सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता निर्माण होत असल्यानं मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं रुग्णांच्या संख्येत घट होण्यास मदत होणार आहे. मुंबई महापालिकेनं याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या उपचारासाठी आता पंचतारांकित हॉटेलचा (5star hotel) वापर करण्यात येणार आहे. त्यामुळं आता खासगी रुग्णालय (private hospital) रुग्णांच्या उपचारासाठी ४ किंवा ५ स्टार हॉटेलचा वापर करणार आहे. यामुळं ज्या रुग्णांना बेडची सर्वाधिक गरज आहे, त्यांना बेड उपलब्ध होईल. ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षण नाहीत, त्यांना या हॉटेलमध्ये पाठवण्यात येईल. त्यांच्यावर याच हॉटेलमध्ये उपचार केले जातील. याबाबत लवकरच खासगी रुग्णालय हॉटेलसोबत करार करणार आहे. या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना बेडसचा प्रश्न सोडवण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील बेडची कमतरता सोडवण्यासाठी खासगी हॉटेल्समधील बेडही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले जाणार आहे. खाजगी रुग्णालयांसोबत फोर-फाईव्ह स्टार हॉटेल्सचा टायअप करण्यात येणार आहे. यात रिकव्हर होत असणारे आणि आयसीयु बेडची गरज नसणारे रुग्ण हॉटेल्समध्ये हलवले जाणार आहेत. अशा रुग्णांना हॉटेलमधील उपचारासाठी स्टेप डाऊन फॅसिलीटी दिली जाणार आहे.

'या' हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर

बॉम्बे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्टेप डाऊन फॅसिलीटीसाठी मरिन ड्राईव्ह येथील InterContinental हॉटेल बुक करण्यात आलं आहे. एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसाठी बिकेसी येथील ट्रायडेंट हॉटेल बुक करण्यात आलं आहे. स्टेप डाऊन फॅसिलीटी दिलेल्या हॉटेल्समध्ये जर पेशंटसोबत एका नातेवाईकासही राहायचं असेल तर त्यांना ट्विन रुम बुक करुन दिल्या जातील. स्टेप डाऊन फॅसिलीटीच्या रुग्णांसाठी दर दिवसाला ४००० रुपयापर्यंतचं शुल्क आकारलं जाईल. तसंच ट्विन रुम फॅसिलीटीसाठी ६००० रुपये आकारले जातील. ज्या हॉटेल्समध्ये किमान 20 खोल्या असतील, तेच हॉटेल स्टेप डाऊन फॅसिलीटी म्हणून खाजगी हॉस्पिटल वापरु शकेल. हॉटेलमधील डॉक्टरांची वेळोवेळी भेट, इतर औषधे आणि वैद्यकिय गरज पुरवणे ही हॉस्पिटलची जबाबदारी असेल.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा