Advertisement

बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी १० हजार १०० रुपये बोनस जाहीर

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी १५ हजार ५०० बोनस जाहीर करण्यात आला होता. याच धर्तीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना १० हजार १०० बोनस जाहीर करण्यात आला आहे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी १० हजार १०० रुपये बोनस जाहीर
SHARES

दरवर्षी दिवाळीनिमित्त महापालिका व बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. यंदाही बोनस दिला या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी १५ हजार ५०० बोनस जाहीर करण्यात आला होता. याच धर्तीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना १० हजार १०० बोनस जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेस्टच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यानं मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली.

कोरोना काळात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा दिली. त्यामुळे त्यांना बोनस देण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा