Advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते आंबिवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळच्या सुमारास विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाच्या दुरूस्तीचे काम तातडीनं हाती घेतल्याने दुपारी १२.१५ सुमारास वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
SHARES

मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते आंबिवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळच्या सुमारास विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाच्या दुरूस्तीचे काम तातडीनं हाती घेतल्याने दुपारी १२.१५ सुमारास वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 


अप मार्गावर बिघाड

मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील टिटवाळा आणि आंबिवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे दोन लोकल एका मागोमाग उभे असून त्यामागे एक एक्सप्रेस उभी होत्या. दरम्यान, शनिवार असल्याने अनेक चाकरमानी कामावर आणि इतर ठिकाणी जात होत. मात्र, सकाळच्या सुमारास झालेल्या या हा बिघाडामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा