Advertisement

मुंबईला मिळणार पहिली चालकविरहीत प्रोटोटाइप मेट्रो

जुलै २०२० पर्यंत मुंबईला पहिल्या प्रोटोटाइप मेट्रो ट्रेनची डिलिव्हरी मिळेल, अशी माहिती नुकतीच मुंबई महानगर विकास प्राधिकरणा (MMRDA)ने दिली आहे.

मुंबईला मिळणार पहिली चालकविरहीत प्रोटोटाइप मेट्रो
SHARES

जुलै २०२० पर्यंत मुंबईला पहिल्या प्रोटोटाइप मेट्रो ट्रेनची डिलिव्हरी मिळेल, अशी माहिती नुकतीच मुंबई महानगर विकास प्राधिकरणा (MMRDA)ने दिली आहे. या प्रोटोटाइप मेट्रो ट्रेन दहिसर ते डी.एन. नगर (2A), डी.एन. नगर ते मंडाले (2 B) आणि अंधेरी ते दहिसर (7) या मार्गांवर चालवण्यात येतील.  

३०१५ कोटींचं कंत्राट

‘एमएमआरडीए’ चे आयुक्त आर. ए. राजीव (R.A.Rajiv) यांनी हे कोच बनवणाऱ्या मे.भारत अर्थ मुव्हर्स लि. (M/S BEML) या कंपनीच्या बंगळुरूतील कारखान्याला नुकतीच भेट दिली. या कंपनीला ३७८ कोच (रोलिंग स्टाॅक) बनवण्याचं ३०१५ कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं आहे. यांत ६ कोचच्या ६३ मेट्रो ट्रेन्सचा समावेश आहे.    

याशिवाय आणखी २१ मेट्रो ट्रेन (१२६) कोच बनवण्याचं अतिरिक्त कामही याच कंपनीकडून करून घेण्यात येणार आहे, असं ‘एमएमआरडी’ने स्पष्ट केलं. या ट्रेनचे नमुने सप्टेंबर २०१९ पर्यंत तयार होतील. 

आधुनिक कोच 

प्रोटोटाइप मेट्रो ट्रेन आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असेल. या मेट्रोचे कोच नव्या पद्धतीचे, वजनाने हलके आणि ऊर्जा वाचवणारे असतील. शिवाय ही मेट्रो कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल   (Communication Based Train Control) (CBTC) तंत्रज्ञानावर आधारीत असेल.

 

या मेट्रोची वैशिष्ट्ये: 

  • माॅर्डन, वजनाने हलके, ऊर्जा वाचवणारे कोच
  • पूर्णपणे आॅटोमॅटीक चालकविरहीत मेट्रो
  • ३.२० मी. रूंद रोलिंग स्टाॅक, स्टेनलेस स्टील बाॅडी
  • ६ कोचमध्ये ३३४ आसनक्षमता
  • उभे प्रवासी धरून ११६० प्रवासी वाहनक्षमता
  • तर, गर्दीच्या वेळेत २०९२ प्रवासी वाहनक्षमता
  • सिंगल फेज २५ के. ए.सी. ट्रॅक्शन
  • रिजनरेटीव्ह ब्रेकींग सिस्टिम 

प्रवासी सुरक्षा

  • कोच बाहेर-आत सीसीटीव्ही कॅमेरे
  • पब्लिक अॅड्रेस/पॅसेंजर इन्फाॅर्मेशन सिस्टिम
  • प्लॅटफाॅर्म स्क्रिन डोअर्स
  • पॅसेंजर अलार्म डिव्हाइस
  • आॅटोमॅटीक व्हाइस अनाऊसमेंट सिस्टिम 



हेही वाचा-

वडाळा ते सीएसएमटीसह ३ मेट्रो मार्गांना मंजुरी

कोस्टल रोडचं भवितव्य अधांतरी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा