Advertisement

ट्रेनमधील खाद्य पदार्थांच्या सेवेत होणार बदल; जाणून घ्या सर्व माहिती

ट्रेनन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ट्रेनच्या खाद्यपदार्थांमध्ये बदल होणार असून, एप्रिलपासून हे बदल केले जाणार आहेत.

ट्रेनमधील खाद्य पदार्थांच्या सेवेत होणार बदल; जाणून घ्या सर्व माहिती
SHARES

ट्रेनन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ट्रेनच्या खाद्यपदार्थांमध्ये बदल होणार असून, एप्रिलपासून हे बदल केले जाणार आहेत. एप्रिलनंतर जेव्हा ट्रेनमधून प्रवास करता तेव्हा तुम्हाला खाद्य सेवा बदललेली दिसेल. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक बदल करणार आहे, ज्यासाठी एक ते दोन महिने लागू शकतात. आयआरसीटीसीनुसार एप्रिलपर्यंत सर्व सुविधा चांगल्या होतील.

आयआरसीटी ट्रेनमधील खानपानाची सुविधा आणखी सुधारण्यासाठी तीन मोठे बदल करणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल. सध्या आयआरसीटी जवळपास ४२८ ट्रेनमध्ये खाद्य पदार्थ पुरवत आहे.

याशिवाय काही गाड्यांमध्ये पँट्री कारही चालवली जात आहे. अशाप्रकारे ५०० हून अधिक गाड्यांमध्ये खाद्य पदार्थांची सुविधा आयआरसीटी उपलब्ध करत आहे.

३ मोठे बदल

सर्व बेस किचनमध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक तैनात केले जातील. हे पर्यवेक्षक कंत्राटी असतील, जे जेवणाच्या गुणवत्तेवर नियमितपणे लक्ष ठेवतील, जेणेकरुन प्रवाशांच्या जेवणाशी संबंधित कोणतीही तक्रार होऊ नये. आयआरसीटीची देशभरात जवळपास ५० बेस किचन आहेत, जिथून खाद्य पदार्थांचा पुरवठा केला जातो.

खाद्य पदार्थांचे नियमित नमुने घेतले जातील. आतापर्यंत प्रवाशांच्या तक्रारीनंतरच खाद्य पदार्थांचे नमुने घेतले जात होते, परंतु आता ट्रेन आणि बेस किचनमध्ये खाद्य पदार्थांचे नियमित नमुने घेतले जाणार आहेत.

ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाने प्रवासी किती समाधानी आहेत, यासाठी काय सूचना आहेत. त्यासाठी सातत्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. सध्या हे सर्वेक्षण आयआरसीटीसीकडून केले जाते, परंतु त्यासाठी वेळ नाही, जे नियोजित वेळेत केले जाईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा