Advertisement

पश्चिम रेल्वेवर तब्बल २,७२९ कॅमेरे बसवण्यात येणार


पश्चिम रेल्वेवर तब्बल २,७२९ कॅमेरे बसवण्यात येणार
SHARES

रेल्वे स्थानक आणि परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे आणि महिला प्रवाशांची सुरक्षा आदी बाबी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं चर्चगेट ते विरार मार्गावरील स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे जुने कॅमेरे बदलण्यात येणार असून त्यांच्या जागी नवे तब्बल २,७२९ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. 

जवळपास १,५२९ नवीन कॅमेऱ्यांची भर पडत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. महिलांची छेडछाड, विनयभंग इत्यादी प्रकारांमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रेल्वेकडून अनेक सुरक्षाविषयक उपाय करताना लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही आणि स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात येत आहे. 

रेल्वेच्या हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हीद्वारे त्याचा यशस्वीरीत्या तपास करण्यास मदत होते. परंतु सीसीटीव्हींची अपुरी संख्या, त्यांचा निकृष्ट दर्जा यामुळे मुंबई विभागातील सीसीटीव्हींचा विषय नेहमीच चर्चेत येतो. म्हणून सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यावर रेल्वेनं भर दिला आहे. 

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरापर्यंतच्या स्थानकांत सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकात १,२०० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ते बदलून त्याऐवजी एकूण २,७२९ नवे कॅमेरा बसवण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत नवीन कॅ मेरा बसवताना त्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. 

हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यामध्ये नवीन १,५२९ कॅमेऱ्यांची भर पडेल. सर्व २,७२९ कॅ मेरे हे आधुनिक प्रकारचे असतील. त्याची दृश्यमानता अधिक चांगली असेल. इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमअंतर्गत हे कॅमेरे बसवले जाणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा