सोमवारपासून मिळणार रेल्वे तिकिटांचे पैसे परत


सोमवारपासून मिळणार रेल्वे तिकिटांचे पैसे परत
SHARES

ऑनलाइन तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना त्यांच्या खात्यात पैसे देण्यात आले. मात्र तिकीट खिडकीवरून काढलेल्या प्रवाशांना आपले पैसे केव्हा मिळणार, अशी चिंता सतावत होती. तिकीट खिडकीवरून तिकीट काढलेल्या प्रवाशांना सोमवारपासून तिकिटांचा संपूर्ण परतावा मिळणार आहे. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक रेल्वे स्थानकांवर मर्यादित स्वरूपात तिकीट खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (४), लोकमान्य टिळक टर्मिनस (३), दादर (२), कल्याण(२), ठाणे (२), कल्याण (२), पनवेल(२) आणि बदलापूर (१) येथे तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे. तसंच, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट (२), मुंबई सेंट्रल (२), वसई रोड (२), बोरिवली (२) या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे.

सोमवारपासून तिकिटांचा परतावा मिळणार आहे. परतावा घेताना नागरिकांनी गर्दी करू नये, करोना संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करावे, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लॉकडाउनमध्ये मार्च ते मे यादरम्यान शेकडो मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 

सध्या या स्थानकांवर १ जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वेचे परराज्यात जाण्यासाठी तिकीट मिळणार आहे. लवकरच या तिकीट खिडक्यांवरून तिकिटांचा परतावा देण्याची सुविधाही देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

संबंधित विषय