Advertisement

मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत


SHARES

मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील आसनगाव येथे पोल क्र. 84 जवळ डाऊन मार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्याचा फटका उपनगरीय गाड्यांनाही बसला. परिणामी सर्वच लोकल गाड्या सुमारे 25 ते 30 मिनिटे उशीराने धावत आहेत.

ही घटना 11.22 वाजता घडली. त्यानंतर कसरा-सीएसटी मार्गावरील सलग तीन लोकल रद्द करण्यात आल्या. तरी अद्याप वाहतूक पूर्वपदावर येऊ शकलेली नाही.

हार्बरवरही सकाळी मानखुर्द स्थानकाजवळ रूळाखालील खडी वाहून गेल्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक सुरू झाली असली, तरी हार्बरचे वेळापत्रक मात्र कोलमडले आहे.

मुंबईत सोमवारपासून पावसाने जोर धरला आहे. सोमवारी ठाणे-कळवा भागात रेल्वे रुळ पाण्याखाली होते. मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. परिणामी रेल्वे रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.


हे देखील वाचा -

'परे'च्या जलद मार्गावर धावणार एसी लोकल


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


संबंधित विषय