'परे'च्या जलद मार्गावर धावणार एसी लोकल

  Mumbai
  'परे'च्या जलद मार्गावर धावणार एसी लोकल
  मुंबई  -  

  बहुचर्चित वातानुकूलित (एसी) लोकल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर धावणार आहे. सध्या ही लोकल सायडिंगला उभी करण्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. तब्बल 54 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेली ही 12 डब्यांची एसी लोकल साधारणत: वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली होती. मध्य रेल्वेवरील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता या लोकलच्या चाचण्या पश्चिम रेल्वेवर सुरू आहेत.


  हेही वाचा - 

  एसी लोकलची प्रतिक्षा संपणार, सप्टेंबरपासून प.रेल्वेवर धावणार

  एसी लोकलची फक्त अफवाच!

  १൦ वर्षांनंतर अशी असेल मुंबई...


  पश्चिम रेल्वेवर 35 वाढीव फेऱ्या -

  पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्टोबरपासून या मार्गावर वाढीव 35 फेऱ्या देण्यात येणार आहेत. यापैकी बहुतांश फेऱ्या अंधेरी ते विरार मार्गावर चालविल्या जाणार आहेत. त्याशिवाय या मार्गावर धावणाऱ्या पहिल्यावहिल्या एसी लोकलसाठी विरार ते चर्चगेट फास्ट मार्गाची निवड करण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.