Advertisement

भंगार विकून मध्य रेल्वेची २२५ कोटी रुपयांची कमाई

मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वे परिसरातील भंगार विकून २२५ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे आणि इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे.

भंगार विकून मध्य रेल्वेची २२५ कोटी रुपयांची कमाई
SHARES

मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वे परिसरातील भंगार विकून २२५ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे आणि इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे. यासह निरुपयोगी रूळ, रुळांचं साहित्य, मोडीत काढलेले डबे, वाघिणी, इंजिने, जुने डबे, माल डबे, चाकं यांची विक्री करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये 'शून्य भंगार मोहिम' सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागानं, मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातील, वर्कशॉप, शेड येथील परिसरातील भंगार विकलं आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेनं २२४.९४ कोटी रुपयांचं भंगार विकलं आहे. शून्य भंगार मोहिमेमुळं भारतीय रेल्वेला अधिकचा महसूल मिळतो.

या मोहिमेमुळं भंगारामुळं व्यापलेली रिकामी होतं. अतिरिक्त जागेची व्यवस्था होते. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेनं निरुपयोगी रूळ, रुळांचं साहित्य भंगारमध्ये विकून ३२१.४६ कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागानं कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लॉकडाऊनमुळं देशभरात जीवनावश्यक, अत्यावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी मालगाडी आणि पार्सल गाडी याची जास्त प्रमाणात आवश्यकता भासली.

यासाठी सामग्री व्यवस्थापन विभागाने देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या आणि पार्सल गाड्यांच्या इंजिनांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे सुटे भाग आणि इतर लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला. पीपीई किट्स, एन- ९५ मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स या वस्तू कर्मचार्‍यांना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी अल्प कालावधीत निविदा काढून खरेदी करण्यात या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा