Advertisement

मरे, हार्बरचा मेगाब्लॉक तर परेचा नाईटब्लॉक


मरे, हार्बरचा मेगाब्लॉक तर परेचा नाईटब्लॉक
SHARES

मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी १७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान दोन नाईट ब्लॉक घेण्यात येतील.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ११.१५ ते संध्याकाळी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणेच्या अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी अप धिम्या मार्गावरील लोकल गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकात थांबणार नाहीत. 

डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ दरम्यान तर, अप जलद मार्गावरील लोकल गाड्या सकाळी १०.२८ ते दुपारी ३.०८ या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या सर्व धिम्या लोकल दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.


हार्बर रेल्वे 

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे केली जातील. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावर सकाळी ९.५२ ते दुपारी ४.३९ वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक सकाळी ९.५२ ते दुपारी ५.०९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून पनवेलकरता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे. रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रवास करू शकतात.


पश्चिम रेल्वेचा नाईटब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान दोन नाईट ब्लॉक घेण्यात येतील. पहिला ब्लॉक शनिवारी रात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ या वेळेत मरीन लाईन्स ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप धिम्या आणि डाउन जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील. दुसरा ब्लॉक चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान मध्यरात्री २.१५ ते पहाटे ४.४५ या वेळेत घेण्यात येईल. ब्लॉक दरम्यान अप दिशेच्या सर्व धिम्या मार्गावरील लोकल गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील. उपनगरीय मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा