Advertisement

वेतनासाठी मध्य रेल्वेतील उद्घोषकांचे काम बंद आंदोलन


वेतनासाठी मध्य रेल्वेतील उद्घोषकांचे काम बंद आंदोलन
SHARES

मागील ३ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने बुधवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील २०० कंत्राटी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे उद्घोषणा ठप्पच झाली. तर सीएसएमटी स्थानकात गुरुवारी धरणे आंदोलन केल्याने एकच गोंधळ उडाला.

कंत्राटदाराला वेतनाचे बिल रेल्वेकडे जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर वेतन लवकरच मिळेल, या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.  रेल्वे स्थानकातील उद्घोषणांसाठी पूर्वी रेल्वेच्या विविध विभागातूनच उद्घोषकांची निवड होत होती. यामध्ये बढती किं वा वेतन वाढीचीही शक्यता नसल्याने रेल्वे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे उद्घोषकांची कमतरता जाणवू लागल्याने मध्य रेल्वेने २०१६ पासून कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती करण्यास सुरुवात केली.

यासाठी एका कंपनीला कंत्राटही दिले. उद्घोषकांची कंत्राटी पद्धतीने दोन वर्षांकरिता भरती के ली जाऊ लागली. सध्या २०० उद्घोषक काम करतात. त्यांना गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. बुधवारपासून उद्घोषकांनी काम बंद आंदोलन केले. यासंदर्भात कंत्राटदाराशी रेल्वे प्रशासनाने चर्चा केली असून त्याला वेतनाची बिले सादर करण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा