Advertisement

मध्य रेल्वेने 23 एक्सप्रेस रद्द केल्या

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेने 23 एक्सप्रेस रद्द केल्या आहेत

मध्य रेल्वेने 23 एक्सप्रेस रद्द केल्या
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेने 23 एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.  मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अशा शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस रद्द केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, हावडा दुरांतो, नंदीग्राम एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस रद्द करण्याच निर्णय घेतला आहे. 

पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्मवरील वाढती गर्दी रोखण्यासाठी एक पाऊल उचललं आहे.  काही स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील तिकीट 10 रुपयांवरून थेट 50 रुपये केलं आहे. हा नियम केवळ त्याच स्थानकांवर लागू होईल ज्या स्थानकांवर गर्दीचं प्रमाण जास्त आहे. पुढील काही दिवसांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी म्हटलं की, की प्रत्येक विभागातील 10 ते 15 रेल्वे स्थानकांवर गर्दीचं प्रमाण जास्त आहे आणि केवळ त्याच स्थानकांवर हा नियम लागू करण्यात आला आहे. सोबतच रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे. लोकांनी गरज असल्यावरच प्रवास करावा.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा