Advertisement

मध्य रेल्वेने केला फुकट्यांकडून ११.३५ कोटींचा दंड वसूल


मध्य रेल्वेने केला फुकट्यांकडून ११.३५ कोटींचा दंड वसूल
SHARES

मध्य रेल्वेने विनातिकीट आणि बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून ऑक्टोबर महिन्यात ११ कोटी ३५ लाख रुपये दंडाची वसुली केली आहे.

एवढंच नाही, तर मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात २.२० लाख गुन्ह्यांची नोंदही केली आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये १.५२ लाख केस दाखल झाल्या होत्या. यावर्षी केसमध्ये ४४.९० टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात ७.०३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. शिवाय, दंडाच्या रकमेतही ६१.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा