ट्रॅकमन, गँगमनच्या सुरक्षेसाठी 'रक्षक'

या यंत्रणेच्या माध्यमातून एक किमी अंतरावर रेल्वेगाडी येताच ट्रॅकमन आणि गँगमन यांनी सावधगिरीचा इशारा मिळणार आहे. एका कर्मचाऱ्याकडे हे उपकरण दिलं जाणार आहे. या उपकरणामुळे गाडी जवळ येताच ड्यूटी बजावणाऱ्या ट्रॅकमन आणि गँगमनला याची माहिती मिळणार आहे.

SHARE

 लाखो किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांची पाहणी अाणि दुरुस्तीची जबाबदारी लाखो ट्रॅकमन आणि गँगमन यांच्यावर असते. हे काम करत असताना अनेकदा या ट्रॅकमन आणि गँगमनना अपघाताला समोरं जावं लागतं. यामध्ये अातापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला अाहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले अाहेत. मात्र, यापुढे अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून रेल्वे मंत्रालय ट्रॅकमन आणि गँगमन यांच्या सुरेक्षसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार अाहे. या तंत्रज्ञानाद्वारे ट्रॅकमन आणि गँगमन यांना एक किलोमीटर अंतरावर रेल्वेगाडी आल्यावर सावधगिरीचा इशारा मिळणार अाहे.

प्रायोगिक तत्वावर 

रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) ने 'रक्षक' नावाची यंत्रणा विकसीत केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून एक किमी अंतरावर रेल्वेगाडी येताच ट्रॅकमन आणि गँगमन यांनी सावधगिरीचा इशारा मिळणार आहे. एका कर्मचाऱ्याकडे हे उपकरण दिलं जाणार आहे. या उपकरणामुळे गाडी जवळ येताच ड्यूटी बजावणाऱ्या ट्रॅकमन आणि गँगमनला याची माहिती मिळणार आहे. तसंच, गाडीने प्लॅटफार्म सोडल्यावर सिग्नल यंत्रणेशी जोडलेल्या या यंत्रणेतून बीप वाजणार आहे. मध्य रेल्वेकडून हे 'रक्षक तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलं अाहे.  मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.हेही वाचा -

आजी-माजी आमदारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सवलत...!

बेस्ट खरेदी करणार ७२३ नवीन बस
संबंधित विषय
ताज्या बातम्या