Advertisement

२९ जानेवारीला धावणार मध्य रेल्वेची एसी लोकल

येत्या बुधवार २९ जानेवारीपासून ही एसी लोकल (AC Local) धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

२९ जानेवारीला धावणार मध्य रेल्वेची एसी लोकल
SHARES

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी-पनवेल (Thana to vashi-Panvel) मार्गावर एसी लोकल धावणार आहे. येत्या बुधवार २९ जानेवारीपासून ही एसी लोकल (AC Local) धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi, Minister of State for Railways) यांच्या हस्ते या एसी लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्याशिवाय, मुंबई उपनगरीय लोकलच्या विविध सोयीसुविधांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेनंतर (Western Railway) गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल चेन्नईच्या (Chennai) आयसीएफ कारखान्यातून (ICF factory) मध्य रेल्वेच्या (Central Railway) ताफ्यात दाखल झाली आहे. ही लोकल दाखल झाल्यानंतर तिची मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर (Transe Harbour) मार्गावरील ठाणे ते वाशी-पनवेल (Thana to vashi-Panvel) मार्गावर चाचणी (Test) घेण्यात आली असून, याच मार्गावर ही लोकल धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार, या लोकलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

चाचणीनुसार ही लोकल सुरूवातीला २४ जानेवारी रोजी चालविण्याचं नियोजन होतं. परंतु, त्या दिवशी मुंबईत मोर्चा असल्यानं ही लोकल २९ जानेवारी रोजी चालविण्यात येणार असून, रेल्वे राज्य मंत्र्यांच्या हस्ते चालविण्याचं नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर धावत असलेली एसी लोकल ही सुरूवातीला मध्य रेल्वे मार्गावर चालविण्याचं नियोजन होतं. परंतु, पुलाची उंची व तांत्रिक अडचणी (Technical Issues) यामुळं ही पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर सुरू करण्यात आली. तसंच, त्यावेळी ही देशातील पश्चिम रेल्वेची पहिली एसी लोकल ठरली. मात्र, आता मध्य रेल्वे मार्गावरील पुलांची उंची व तांत्रिक अडचणी लक्षात घेत 'भेल' कंपनीनं खास कमी उंचीची एसी लोकल तयार केली असून, या लोकलची उंची १३ मि.मी.नं कमी करण्यात आली आहे.

ठाणे ते वाशी-पनवेल मार्गावर एसी लोकलच्या दिवसभरात १६ फेऱ्या होणार आहेत. या मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड डीसी-एसी लोकल हटविण्यात येणार आहेत. एसी लोकलच्या मध्ये दोन्ही टोकांना लेडीज डबा (Ladies Coach) आरक्षित ठेवण्यात येणार असून, यामध्ये महिला आरपीएफ पोलीस (RPF Constable) तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. तसंच, या मार्गवर ज्या ठिकाणी दगडफेक होऊ शकतात, अशा संवेदनशील ठिकाणांवर पोलीस (Police) बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

एसी लोकलचं भाडं

  • ठाणे ते वाशी – १३० रुपये
  • ठाणे ते पनवेल – १७५ रुपये



हेही वाचा -

मनसेच्या झेंड्याविरोधात कोर्टात जाणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

राज्यभरात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा