Advertisement

मनसेच्या झेंड्याविरोधात कोर्टात जाणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा


मनसेच्या झेंड्याविरोधात कोर्टात जाणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (mns) पहिलं महाअधिवेशन २३ जानेवारीला मुंबईतील गोरेगाव इथं होत आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) पक्षाला नवी दिशा देणारं असल्याचं म्हटलं जात आहे. याच अधिवेशनात मनसे जुन्या झेंड्याच्या जागी भगव्या रंगाचा नवा झेंडा (saffron flag) आणणार असल्याचंही सांगितलं जात आहे. याच झेंड्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला. मनसेच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.  

मनसे आपल्या नव्या झेंड्यातून निळा, हिरवा आणि पाढरा रंग काढून टाकणार असून नव्या झेंड्यात केवळ भगवा रंगच असणार आहे. शिवाय या झेंड्यात शिवमुद्रा (shivmudra) असण्याचीही शक्यता आहे. मनसेने निवडणूक आयोगाकडे (election commission) दोन प्रकारचे झेंडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातील एक झेंडा शिवमुद्रा असलेला आहे. तर, दुसऱ्या झेंड्यावर मनसेचं निवडणूक चिन्ह इंजिन आहे. 

हेही वाचा- मनसेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध

यापैकी शिवमुद्रा असलेल्या झेंड्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (chatrapati shivaji maharaj) ‘राजमुद्रा’ राजकारण करण्याचं साधन नाही स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रेची निर्मिती केली होती. त्यामुळे कुठल्याही पक्षाने राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने (sambhaji bridge) मनसेच्या झेंड्याला सर्वप्रथम विरोध केला.

त्यापाठोपाठ मराठा क्रांती मोर्चानेही (maratha kranti morcha) मनसेच्या नव्या झेंड्याचा विरोध केला आहे. शिवरायांची राजमुद्रा हा ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे राजकारणासाठी त्याचा वापर होऊ नये, कुणाच्या राजकारणाविरोधात आम्ही नाही. उलट आम्ही मनसेच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छाच देतो. परंतु केवळ राजकीय पक्षच नाही, तर कुणीही शिवमुद्रेचा वापर आपल्या स्वार्थ्यासाठी करू नये, यासाठी आम्ही न्यायालयात जाऊन शिवमुद्रेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करू. यासंदर्भात आम्ही राज्य सरकारलाही पत्र पाठवल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अॅड. विनोद पाटील (vinod patil) यांनी दिली.

मनसे आपल्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर करणार की नाही हे ठाऊक नाही, पण त्यांनी तसं करू नये, अशीच आमची इच्छा असल्याचंही पाटील म्हणाले.  

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या दिवशी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार पक्षाकडून करण्यात येणार आहे. या दिवशी मनसे आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिपदर्शन केलं जाणार आहे. 

हेही वाचा- ‘शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच ती वेळ’

संबंधित विषय
Advertisement