SHARE

मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे 1 फेब्रुवारीला हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर रोज होणाऱ्या तांत्रिक बिघाडासोबतच आता रेल्वे प्रशासनाला गार्ड आणि मोटरमनच्या आंदोलनादेखील सामोरे जावं लागणार आहे. मोटरमन आणि गार्ड यांच्या कामाच्या ड्युट्या लावणाऱ्या समितीमधील प्रतिनिधीत्वावरुन गार्ड आणि मोटरमन यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे.

गार्ड आणि मोटरमन यांची ड्युटी लावण्यासाठी मध्य रेल्वेवर एक समिती आहे. या समितीमध्ये मोटरमन आणि गार्ड यांच्या प्रत्येकी दोन-दोन अशा एकूण चार सदस्यांचा समावेश असतो. या सदस्यांसाठी गार्ड आणि मोटरमन यांच्यात अंतर्गत निवडणुका होतात आणि त्यातून त्या सदस्यांची निवड केली जाते. रेल्वे प्रशासनाने येत्या दोन दिवसांत याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर 1 फेब्रुवारीला जादा वेळ काम बंद आंदोलन करण्याचा इशारा मोटरमन आणि गार्डच्या विविध संघटनांनी दिला आहे. त्यामुळे, बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या