Advertisement

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीत वाढ, मोजावे लागतील 'इतके' रुपये

रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीत वाढ, मोजावे लागतील 'इतके' रुपये
SHARES

मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील निवडक रेल्वे स्टेशवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता १० रुपयांऐवजी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.

सेंट्रल रेल्वेनं प्लॅटफॉर्ट तिकीटांमध्ये पाचपट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST),दादर आणि लोकमान्य तिलळ टर्मिनस सामील आहेत.

याबाबत रेल्वे विभागानं सांगितलं की, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. लवकरच येणाऱ्या समर सीजनसाठीही आमच्याकडे प्लॅन तयार आहे.

मुंबईसोबतच ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्टेशनवरही प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केलं आहे. सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) शिवाजी सुतार म्हणाले की, प्लॅटफॉर्म तिकीटांचे नवीन दर २४ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. हे नवीन रेट १५ जूनपर्यंत राहणार आहेत.



हेही वाचा

जुन्या वाहनांनाही बारकोड, होलोग्राम असलेल्या पाट्या बंधनकारक

महापालिका ताफ्यातील 'इतक्या' गाड्या काढणार भंगारात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा