Advertisement

जुन्या वाहनांनाही बारकोड, होलोग्राम असलेल्या पाट्या बंधनकारक

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १ एप्रिल २०१९ पासून उत्पादकांनी किंवा वितरकांनी नव्या वाहनांना बारकोड, होलोग्राम असलेल्या पाटय़ा बसवून देणं बंधनकारक केलं आहे.

जुन्या वाहनांनाही बारकोड, होलोग्राम असलेल्या पाट्या बंधनकारक
SHARES

जुन्या वाहनांनाही आता बारकोड आणि होलोग्राम असलेल्या पाट्या बंधनकारक करण्यात येणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेल्या पाटय़ा जुन्या वाहनांनाही बसवण्याची तयारी परिवहन विभागाने सुरू केली आहे.१ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनचालकांना पाट्या बदलून घ्याव्या लागणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १ एप्रिल २०१९ पासून उत्पादकांनी किंवा वितरकांनी नव्या वाहनांना बारकोड, होलोग्राम असलेल्या पाट्या बसवून देणं बंधनकारक  केलं आहे.  १ एप्रिलनंतरच्या वाहनांना नव्या पद्धतीच्या क्रमांक पाट्या नसल्यास वाहन नोंदणी न करण्याची सूचना राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. आता नव्या वाहनांबरोबरच एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 नव्या पद्धतीची पाटी ही अ‍ॅल्युमिनियमची असून ती वाहनाला कायमस्वरूपी लावण्यात आल्याने बदलली जाऊ शकत नाही. नवीन पाटी ही बदललेल्या जागीच लावू शकतो.

पाटीची वैशिष्टय़े

-  सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना लावण्यात येणाऱ्या पाटय़ांवरील क्रमांक ‘हॉट स्टॅम्पिंग’द्वारे टाकण्यात येतो.

- बारकोड आणि थ्रीडी होलोग्रामचाही या पाटय़ांवर समावेश असतो.

- संबंधित बारकोड आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी स्कॅन केल्यास त्यांना वाहनांबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते

- बारकोड केंद्रीय मंत्रालयाच्या वाहन प्रणालीशीही जोडलेला असतो

- ही पाटी वाहनाला कायमस्वरूपी बसवलेली असेल. त्याची नक्कलही कुणी करू शकणार नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा