Advertisement

कल्याण रेल्वे स्थानकात वयोवृद्ध व्यक्तीला जीवदान

वेळीच प्रसंघावधान दाखवत लोको पायलटनं वेळीच ब्रेक मारल्यानं वयोवृद्ध व्यक्तीला जीवदान मिळालं आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात वयोवृद्ध व्यक्तीला जीवदान
SHARES

रेल्वे रुळ ओलांडू नका, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करा, अशा उद्घोषणा रेल्वे प्रवाशांसाठी वारंवार केल्या जातात. मात्र, तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात घडली असून, रविवारी हा धोकादायत प्रकार घडला. मात्र, वेळीच प्रसंघावधान दाखवत लोको पायलटनं वेळीच ब्रेक मारल्यानं वयोवृद्ध व्यक्तीला जीवदान मिळालं आहे.

रेल्वे प्रशासनाच्या आव्हानानंतर देखील अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात टाकत असा प्रवास करतात अशा प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडून दंड केला जातो. उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने वारंवार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यातच आता निर्बंध झुगारून रेल्वे स्थानकात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश द्वाराऐवजी रेल्वे रूळ ओलांडून स्थानकात प्रवेश मिळवणाऱ्यांची भर पडली आहे.

मुंबई-वाराणसी एक्स्प्रेससमोर एक वयोवद्ध व्यक्ती आली. मात्र, लोको पायलटने वेळीच प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. रेल्वे इंजिन खाली अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे. प्रसंगावधान दाखल्याबद्दल लोको पायलटसह इतर अधिकाऱ्यांना २००० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा